आमचा रंग ओरिजनल; रावसाहेब दानवेंचं संजय राऊतांना प्रत्युत्तर

आमचा रंग ओरिजनल; रावसाहेब दानवेंचं संजय राऊतांना प्रत्युत्तर

| Updated on: Mar 18, 2022 | 3:46 PM

आमचा रंग ओरिजनल आहे. कुणाचा रंग कसा आहे, हे निवडणुकीत ठरतं. शिवसेनेनं (Shiv Sena) दाऊदच्या माणसाला साथ दिली तेव्हाच त्यांचा रंग फिका पडलाय अशी फटकेबाजी भाजप नेते आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी केली. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपच्या (BJP) रंगात भेसळ आहे, असं वक्तव्य नुकतंच केलं असून त्याला रावसाहेब दानवे यांनी हे प्रत्युत्तर दिलं.

औरंगाबादः आमचा रंग ओरिजनल आहे. कुणाचा रंग कसा आहे, हे निवडणुकीत ठरतं. शिवसेनेनं (Shiv Sena) दाऊदच्या माणसाला साथ दिली तेव्हाच त्यांचा रंग फिका पडलाय अशी फटकेबाजी भाजप नेते आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी केली. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपच्या (BJP) रंगात भेसळ आहे, असं वक्तव्य नुकतंच केलं असून त्याला रावसाहेब दानवे यांनी हे प्रत्युत्तर दिलं. होळीनिमित्त टीव्ही 9 मराठीच्या प्रतिनिधींशी त्यांनी खास संवाद साधला. यावेळी त्यांनी त्यांच्या नेहमीच्या खास शैलीत सर्व प्रश्नांना खुमासदार उत्तरं दिली. रावसाहेब दानवे यांचा आज वाढदिवसदेखील आहे, त्यामुळे शेकडो कार्यकर्त्यांनी त्यांना आज शुभेच्छा दिल्या. दानवे यांच्या घरी आज धुळवड आणि वाढदिवस असा दोन्ही दिवसांचे खास सेलिब्रेशन रंगले होते.

YouTube video player

Published on: Mar 18, 2022 03:46 PM
‘भाजपकडून काहीतरी शिकण्यासारखं आहे हे पवारांनीही केलं मान्य’, चंद्रकांत पाटील यांचा टोला
केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेंच्या घरी धुळवड साजरी