शिवसेना खासदारांमधील फूटबाबत रावसाहेब दानवेंची प्रतिक्रिया
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची खासदारांची मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मान्य केल्यानंतरही पक्षाचे 12 खासदार सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ सिंदे यांच्या गटात दाखल झाले.
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जी तारीख ठरवतील, त्याच तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. हा त्यांचा अधिकार आहे,” अशी प्रतिक्रिया रावसाहेब दानवे यांनी दिली. शिवसेना खासदारांचा एक गट शिंदे गटात सहभागी झाला, याबद्दल प्रश्न विचारला असता “हा शिवसेनेचा अंतर्गत विषय आहे” असं ते म्हणाले. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची खासदारांची मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मान्य केल्यानंतरही पक्षाचे 12 खासदार सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ सिंदे यांच्या गटात दाखल झाले.
Published on: Jul 19, 2022 02:47 PM