मृदू कवचाच्या ‘त्या’ दुर्मिळ कासवांना जीवदान; अशा पद्धतीने त्यांना केलं सुरक्षित, बघा व्हिडीओ

| Updated on: Aug 04, 2024 | 3:23 PM

मी लोणारकर या टीमकडून मृदू कवचाच्या दुर्मिळ कासवांना जीवनदान देण्यात आलं आहे. इतकंच नाहीतर मी लोणारकर या टीमकडून नैसर्गिक अधिवासात या कासवांना सोडण्यात आले असून त्यांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर परिसरामध्ये शहरालगत दोन मृदू कवचाचे कासव...

बुलढाणा जिल्ह्यातील लोणार भागात मृदू कवचाचे दुर्मिळ कासव आढळले आहे. मी लोणारकर या टीमकडून मृदू कवचाच्या दुर्मिळ कासवांना जीवनदान देण्यात आलं आहे. इतकंच नाहीतर मी लोणारकर या टीमकडून नैसर्गिक अधिवासात या कासवांना सोडण्यात आले असून त्यांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर परिसरामध्ये शहरालगत दोन मृदू कवचाचे कासव मी लोणारकर टीमच्या सदस्यांना आढळून आले आहेत. दुर्मिळ असणाऱ्या या मृदू कवचाच्या कासवांची गैरसमजुतीतून अनेक जण तस्करी देखील करत असतात. त्यामुळे या कासवांच्या जीवाला धोका उद्भवू नये, यासाठी मी लोणारकर टीम कडून या कासवांना रेस्क्यू करण्यात आले आहे. या कासवांचे रेस्क्यू करण्यात आल्यानंतर लोणार येथील परिसरात असलेल्या तलावात या कासवांना सोडून जीवदान देण्यात आले आहे.

Published on: Aug 04, 2024 03:23 PM
पुण्यातील पुरस्थितीवर शिंदे मोठा निर्णय घेणार? मुख्यमंत्र्यांच्या जिल्हाधिकारी, पालिका आयुक्तांना थेट सूचना
भंडारदरा पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस, विसर्ग सुरू; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा