रश्मी ठाकरे शिंदेंच्या बालेकिल्ल्यात; देवीची आरती आणि जोरदार शक्तीप्रदर्शन

| Updated on: Sep 29, 2022 | 5:09 PM

शिवसेनेच्या आजच्या शक्तिप्रदर्शनामुळे शिंदे गटाला तगडं आव्हान उभं राहणार असल्याचं सांगितलं जात आहे.

ठाणे: शिवसेनेतील फुटीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (rashmi thackeray) पहिल्यांदाच ठाण्यात आल्या आहेत. ठाण्यात आल्यानंतर त्यांनी आनंद दिघे यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. त्यानंतर त्यांनी टेंभी नाका येथील देवीची आरती केली. यावेळी शिवसैनिकांची तुफान गर्दी झाली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांनी बंड केल्यानंतर ठाण्यातील शिवसेनेचं अस्तित्व संपुष्टात आल्याचं बोललं जात होतं. ठाण्यातील जवळपास सर्वच नगरसेवकांनी शिंदे गटात प्रेश केल्याने शिवसेना ठाण्यातून हद्दपार झाल्याचीही चर्चा होती. पण आज रश्मी ठाकरे ठाण्यात येताच हजारो शिवसैनिक एकटवल्याने ठाण्यात शिवसेना अजूनही भक्कम असल्याचं स्पष्ट झालं. शिवसेनेच्या आजच्या शक्तिप्रदर्शनामुळे शिंदे गटाला तगडं आव्हान उभं राहणार असल्याचं सांगितलं जात आहे.

Published on: Sep 29, 2022 05:00 PM
Uddhav Thackeray : ‘बंड नाही तोतयेगिरी’, उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
महाविकास आघाडीत मुंडकी खाणारा डायनासॉर; अब्दुल सत्तार यांनी कोणत्या नेत्यावर केलेय ही घणाघाती टीका