Osmanabad | उस्मानाबाद जिल्ह्यातील चौधरी कुटुंबात जन्माला आले राष्ट्रपती आणि पंतप्रधान!

| Updated on: Nov 22, 2021 | 10:07 PM

नावात काय आहे? या शेक्सपियरच्या विधानावर अनेक चर्चासत्र झडली असतील. अनेक विद्वान आणि अभ्यासकांनी त्याचा किस पाडला असेल. मात्र, माणूस किंवा कुठलीही वस्तू नावानेच तर ओळखली जाते, असं सर्वसामान्य बोलून जातात.

नावात काय आहे? या शेक्सपियरच्या विधानावर अनेक चर्चासत्र झडली असतील. अनेक विद्वान आणि अभ्यासकांनी त्याचा किस पाडला असेल. मात्र, माणूस किंवा कुठलीही वस्तू नावानेच तर ओळखली जाते, असं सर्वसामान्य बोलून जातात. मात्र, उस्मानाबादेत सध्या दोन नावांची चांगलीच चर्चा सुरु आहे आणि दुसरं म्हणजे एकाच घरात राष्ट्रपती आणि पंतप्रधान जन्माला आलेत! तुम्ही म्हणाल हा काय प्रकार? तर त्याचं झालं असं की, उस्मानाबाद जिल्ह्यातील चौधरी कुटुंबानं आपल्या मुलांची नावं थेट राष्ट्रपती आणि पंतप्रधान अशी ठेवली आहेत. ते ही पाळण्यात घालून, अगदी परंपरेनुसार! उस्मानाबादच्या उमरगा तालुक्यातील चिंचोली (भूयार) गावातील दत्ता आणि कविता चौधरी यांनी आपल्या बाळाचं “पंतप्रधान” असं नामकरण केलंय! इतकंच नाही तर त्यांच्या पहिल्या मुलाचं नावही ‘राष्ट्रपती’ असं आहे. त्यामुळे आता राष्ट्रपती आणि पंतप्रधान हे दोघे एकाच कुटुंबात वाढणार आहेत! ग्रामीण भागात बाळाचा नामकरण सोहळा मोठ्या थाटामाटात केला जातो. त्यासाठी खास पाळणा, आकर्षक सजावट केली जाते, पै-पाहुण्यांना निमंत्रण दिलं जातं. मग बाळाच्या कानात कुरररर करुन त्याचं नाव ठेवलं जातं. ही परंपरा जपत अगदी उत्साहात चौधरी कुटुंबाने आपल्या दोन्ही मुलांचा नामकरण सोहळा केलाय.

परिवहन मंत्र्यांनी हट्ट बंद करावा आणि न्याय देण्याच्या दृष्टीने चर्चेला लागावं : Narayan Rane
Shambhuraj Desai | परमबीर सिंह यांनी दिलेले पत्र ही स्टंटबाजी : शंभूराज देसाई