Nagpur | नागपुरात रेशन घोटाळा, एका पोत्यात 2 ते 3 किलो वजन कमी येत असल्याचा दुकानदार संघटनेचा आरोप
नागपुरात रेशन घोटाळा होत असल्याचे समोर आले आहे. एका पोत्यात 2 ते 3 किलो वजनाचे धान्य कमी येत असल्याचा आरोप दुकानदार संघटनेने केला आहे.
नागपुरात रेशन घोटाळा होत असल्याचे समोर आले आहे. एका पोत्यात 2 ते 3 किलो वजनाचे धान्य कमी येत असल्याचा आरोप दुकानदार संघटनेने केला आहे. यात जवळपास 65 लाखांचा घोटाळा होत असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. या संदर्भात अधिकाऱ्यांकडे वेळोवेळी तक्रारी दाखल केली आहेत. धान्य घेऊन येणाऱ्या गाडीत वजन काटा असावा आणि त्यात धान्य मपले जावे अशी मागणी देखील केली. पान, त्या लोकांचे अधिकाऱ्यांशी असलेले संबंध पाहता या गोष्टी होत नाहीत.