Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहीण’ योजनेच्या अंमलबजावणीत ‘हा’ जिल्हा टॉप 10 मध्ये… बघा तुमचा जिल्हा तर नाही ना?
राज्यातील महायुती सरकारने राज्यातील पात्र आणि लाभार्थी महिलांसाठी आर्थिक सहाय्य म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली. गेल्या काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या घोषणेची घोषणा केली. या योजनेची घोषणापासून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून महिलांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
रत्नागिरी जिल्हा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीत टॉप 10 मध्ये आहे. रत्नागिरी जिल्ह्यातून या योजनेसाठी 2 लाख 73 हजार 977 अर्ज प्राप्त झालेत. त्यापैकी 2 लाख 17 हजार 381 अर्जांची छाननी पुर्ण झाली आहे. रत्नागिरी जिल्हयातील लाडकी बहीण योजनेतील जवळपास 60 हजार अर्ज अद्याप प्रलंबित आहेत. दरम्यान, 128 अर्ज हे बाद करण्यात आले आहेत. एकूण 2 लाख 73 हजार 977 अर्जांपैकी 79 टक्के लाडकी बहीण योजनेचे अर्ज शासनाकडे छाननी करून वर्ग करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पुजार यांनी दिली आहे. अर्जाची छाननी करताना अंगवाणी, ग्रामपंचायतीमध्ये एक शिबीर घेण्यात आलं होतं. त्यामध्ये सर्व लाभार्थ्यांना योजनेची माहिती देण्यात आली होती. यासोबतच कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असणार आहे, याची माहिती देखील किर्ती किरण पुजार यांनी दिली आहे.