कोकणवासीयांसाठी महत्त्वाची बातमी! एनरॉन प्रकल्प पुन्हा सुरु होणार?

| Updated on: Nov 02, 2022 | 12:11 PM

1995 साली तत्काली युती सरकारच्या काळातील वादग्रस्त प्रकल्पाबाबत महत्त्वाची अपडेट!

रत्नागिरी : रत्नागिरी (Ratnagiri Latest News) जिल्ह्यातील एनरॉन प्रकल्प (Enron Project) पुन्हा सुरु करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. 1995 सालच्या युती सरकारच्या काळतील एक वादग्रस्त प्रकल्प म्हणून ओळखला जातो. हा प्रकल्प आता पुन्हा सुरु करण्यासाठी शिंदे-भाजप सरकारकडून (Shinde And BJP Allience Government) पुन्हा प्रयत्न सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. या प्रकल्पावरुन मोठा वाद आणि राजकारणही झालं होतं. एनरॉन प्रकल्पासाठी पाठपुरावा केला जातो आहे. राज्य सरकारकडून केंद्राकडे एनरॉन प्रकल्पाबाबत पाठपुरावा करत असल्याची माहिती मिळतेय. तत्कालीन युती सरकारच्या काळातील हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता. या प्रकल्पाचा भाग असलेला एनरॉन पॉव प्लांट पुन्हा सुरु करण्यासाठीच्या हालचालींना वेग आलाय. येत्या काळात या प्रकल्पाच्या अनुषंगाने राजकीय घडामोडींना वेग येण्याची दाट शक्यता आहे.

Published on: Nov 02, 2022 12:11 PM
इक्बाल चहल यांना आयुक्तपदावरून हटवा, रईस शेख यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
सरकार मोदी-शहा यांचं हस्तक; काँग्रेसच्या ‘या’ नेत्याचा पुन्हा शिंदे, फडणवीस यांना टोला