म्हणून मी शिवसेना सोडली, बाळासाहेबांना लिहिलेल्या 7 पानी पत्रात राणेंनी काय म्हटलं?

| Updated on: May 01, 2024 | 4:53 PM

रत्नागिरी-सिंधुदुर्ग या मतदारसंघात भाजपचे उमेदवार नारायण राणेंनी आपला जोरदार प्रचार सुरू केला आहे. रत्नागिरीतील प्रचारसभेत बोलताना नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली तर शिवसेना सोडण्यामागचं खरं कारणही त्यांनी बोलून दाखवलं. बघा काय म्हणाले नारायण राणे?

Follow us on

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान ७ मे रोजी होणार असून या टप्प्यात रत्नागिरी-सिंधुदुर्ग या मतदारसंघात मतदान होणार आहे. दरम्यान, रत्नागिरी-सिंधुदुर्ग या मतदारसंघात भाजपचे उमेदवार नारायण राणेंनी आपला जोरदार प्रचार सुरू केला आहे. रत्नागिरीतील प्रचारसभेत बोलताना नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली तर शिवसेना सोडण्यामागचं खरं कारणही त्यांनी बोलून दाखवलं. नारायण राणेंनी एक किस्सा सांगताना असे म्हटले की, बाळासाहेबांना 7 पानी पत्र दिले आणि उद्धव ठाकरेंमुळे शिवसेना सोडली. उद्धव ठाकरे आणि माझं जमणार नाही अस साहेबांना सांगितलं, असं सांगतानाच बाळासाहेब ठाकरेंमुळे मी घडलो. ह्याचं दुकान बंद केलं पाहिजे. आता चूक करू नका. तुमचं आमचं तरुण पिढीच भवितव्य बदलायचं असेल तर मोदींना मतं द्या, असं आवाहन राणेंनी केलं. तर ठाकरेंवर टीका करताना राणे म्हणाले, उद्धव ठाकरे आणि विनायक राऊत यांना प्रत्येक कामात पैसे पाहिजेत. मोदी, शाह आणि फडणवीस यांच्यावर टीका करता. तुम्ही अडीच वर्षात काय झक मारली ते पाहा. तू केवढा आहेस? जनाची नाय तर मनाची तरी लाज बाळग. योगायोगाने हिंदुत्वाशी गद्धारी करून शरद पवार यांच्या मांडीवर बसून मुख्यमंत्री झालास, असे म्हणत नारायण राणेंनी हल्लाबोल केला.