किरण सामंतांची आपल्याच भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर, फोटो हटवले

| Updated on: May 01, 2024 | 5:16 PM

कोकणातून एक मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. किरण सामंतांच्या कार्यकर्त्यांनी उदय सामंत यांच्या संपर्क कार्यालयावरील बॅनर हटवल्याचे पाहायला मिळाले. तर उदय सामंत नाही तर किरण सामंत संपर्क कार्यालय असे बॅनर तेथे लागणार? नेमकं काय घडलं?

गेल्या काही दिवसांपूर्वी रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातील जागा महायुतीकडून कोण लढवणार? याचा तिढा कायम होता. महायुतीतून शिंदेंच्या शिवसेनेकडून उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक होते. बरेच दिवस त्यांना उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा असताना किरण सामंत यांच्यासोबत उदय सामंत यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत किरण सामंत यांनी माघार घेतली असल्याचे जाहीर केले. यानंतर लगेच भाजपकडून नारायण राणे यांनी लोकसभेचं तिकीट जाहीर करण्यात आलं. यानंतर रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच कोकणातून एक मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. किरण सामंतांच्या कार्यकर्त्यांनी उदय सामंत यांच्या संपर्क कार्यालयावरील बॅनर हटवल्याचे पाहायला मिळाले. तर उदय सामंत नाही तर किरण सामंत संपर्क कार्यालय असे बॅनर तेथे लागणार असल्याचे सांगितले जात आहे. किरण सामंत संपर्क कार्यालय अशा नावाचे बॅनर छापले जाणार असल्याचीही माहिती समोर येत आहे.

Published on: May 01, 2024 05:16 PM
म्हणून मी शिवसेना सोडली, बाळासाहेबांना लिहिलेल्या 7 पानी पत्रात राणेंनी काय म्हटलं?
मग आता सभा घेऊन कुणाचं पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?