Ratnagiri | अवकाळी पावसाचा आंबा पिकाला मोठा फटका, मोहर गेले गळून

| Updated on: Dec 02, 2021 | 11:40 AM

अवकाळी पावसाने आलेला मोहर गेला गळून गेलाय.  त्यामुळं आंबा हंगाम लांबण्याची शक्यता आहे.  आंब्याच्या झाडा वरती आलेल्या छोट्या कैरी पावसातगळून पडल्य आहेत.  अवकाळी पावसामुळे मोहरावर तुडतुडे आणि बुरशीचा प्रादुर्भाव झाला आहे. 

रत्नागिरी जिल्ह्यातील किनारपट्टी भागात रात्रभर पावसाच्या जोरदार सरी बरसत होत्या. पहाटेपासून जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाची रिपरिप सुरु आहे. मात्र सकाळपासून पावसाची विश्रांती पहायला मिळतेय. अधुन मधून पावसाच्या सरी बरसतायत. अरबी समुद्रातील कमी दाब्याच्या पट्यामुळे कोकणाला आँरेज अलर्ट जारी केलाय. पुढील दोन दिवस मेघगर्जेनेसह पावसाची शक्यता वर्तवली जातेय.जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. तर काही ठिकाणी मेघ गर्जनेसह मुसळधार पाऊस झाला. दरम्यान अचानक पडलेल्या पावसामुळे नागरिकांची चंगलीच तारांबळ उडाली. तर पावसामुळे हवेत सुखद गारवा देखील निर्माण झाला. अवकाळी पावसाचा सर्वात मोठा फटका आंबा पिकाला बसला आहे.  अवकाळी पावसाने आलेला मोहर गेला गळून गेलाय.  त्यामुळं आंबा हंगाम लांबण्याची शक्यता आहे.  आंब्याच्या झाडा वरती आलेल्या छोट्या कैरी पावसातगळून पडल्य आहेत.  अवकाळी पावसामुळे मोहरावर तुडतुडे आणि बुरशीचा प्रादुर्भाव झाला आहे.

Sanjay Raut | व्हायब्रंट गुजरातसाठी मुंबईत रोड शो, त्याला आम्ही लूट म्हणतो : संजय राऊत
ठाण्यात रिक्षाचालकांची स्वयंघोषित दरवाढ, प्रवाशांमध्ये संताप