Sawatsada Waterfall : सह्याद्रीच्या कडे-कपारीतून कोसळणारा पांढऱ्याशुभ्र सवतसडा धबधब्याची बघा विलोभनीय दृश्य

| Updated on: Jul 20, 2024 | 4:08 PM

रत्नागिरीतील चिपळूणचा हा सवतसडा धबधबा देखील मुसळधार पावसामुळे प्रवाहित झाला आहे. त्यामुळे प्रेक्षकांची पाऊलं या धबधब्याकडे वळताना दिसताय. सध्या होत असलेल्या मुसळधार पावसामुळे चिपळूणच्या सवतसड्याचं रौद्र रुप पाहायला मिळतंय. बघा विलोभनीय दृश्य

पावसाळ्यात चिपळूणमधील सवतसडा या धबधबा पर्यटकांना खास आकर्षण असते. चिपळूणमधील सवतसडा हा धबधबा पर्यटनासाठी लोकप्रिय आहे. मुंबई-गोवा महामार्गावरून सवतसडा या धबधब्याचे दर्शन होते. सध्या पावसाळ्याचे दिवस आहे. मुसळधार पावसामुळे कोकणातील सौंदर्य हे अधिकच खुलून दिसते. पावसाळा सुरू झाल्यानंतर कोकणातील कोणत्याही ठिकाणावर जिथे आपली नजर जाईल तिथे घनगर्द हिरवाई… दाट धुके… अन् बेफाम कोसळणारे धबधबेच पाहायला मिळतात. अशातच रत्नागिरीतील चिपळूणचा हा सवतसडा धबधबा देखील मुसळधार पावसामुळे प्रवाहित झाला आहे. त्यामुळे प्रेक्षकांची पाऊलं या धबधब्याकडे वळताना दिसताय. सध्या होत असलेल्या मुसळधार पावसामुळे चिपळूणच्या सवतसड्याचं रौद्र रुप पाहायला मिळतंय. रत्नागिरीत पावसाचा जोर कायम असल्याने सवतसडा धबधबा
प्रचंड वेगाने कोसळत आहे. मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटाच्या पायथ्याशी हा सवतसडा धबधबा आहे. तेथील अल्हाददायक सूंदर वातावरण अनुभवण्यासाठी पर्यटक दाखल होतात.

Published on: Jul 20, 2024 04:08 PM
‘गुलाबी जॅकेट’ वरून प्रश्न विचारताच अजितदादा पत्रकारांवर भडकले, तुला काही त्रास होतोय…
दाट धुकं, वळणांचा रस्ता अन् उंच डोंगर रांगांत धुक्याचा लपंडावाचा खेळ… बघा आंबा घाटातून निसर्गाचा नजारा