ट्रायल घेण्यासाठी गेलेली बोट खोल समुद्रात बुडाली अन्…, बघा व्हिडीओ
रत्नागिरी तालुक्यातील पूर्णगड समुद्रात एक नौका गुरूवारी सायंकाळी बुडाली. खराब वातावरण आणि तांत्रिक बिघाडामुळे नौकेत पाणी भरले आणि ती बुडू लागली, अशी माहिती मिळत आहे. तर त्या नौकेवरील दोन खलाशांना मत्स्य विभाग आणि तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरने रेस्क्यू करण्यात आले.
रत्नागिरी तालुक्यातील पूर्णगड समुद्रात एक दुर्घटना घडली आहे. रत्नागिरी तालुक्यातील पूर्णगड समुद्रात बोटीची ट्रायल घेण्यासाठी गेलेली नौका बुडाल्याचे समोर आले आहे. ट्रायल घेण्यासाठी गेलेली नौका बुडाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली आहे. रत्नागिरी तालुक्यातील पूर्णगड समुद्रात बोटीचं ट्रायल सुरू असताना वातावरण चांगलं नसल्याची माहिती मिळतेय. तर खराब वातावरणामुळे नौकेत पाणी भरले आणि ही नौका बुडाल्याची घटना घडली आहे. ट्रायल घेण्यासाठी समुद्रात गेलेल्या नौकेवरील 2 खलाशांना कोस्टगार्डच्या हेलिकॉप्टरच्या सहाय्याने रेस्क्यू करण्यात आले आहे. कोस्टगार्ड वेळेतच हजर राहिल्याने नौकेवरील 2 खलाशांचे प्राण वाचल्याची माहिती मिळत आहे. बघा रत्नागिरी तालुक्यातील पूर्णगड समुद्रातील खलाशांना कोस्टगार्डच्या हेलिकॉप्टरच्या सहाय्याने रेस्क्यू करण्यात येत असल्याचा व्हिडीओ