Dhopeshwar Refinery : रत्नागिरीतील धोपेश्वर रिफायनरी प्रकल्पाबाबत मोठी बातमी! 7 गावांमधून मिळालं संमतीपत्र

| Updated on: Sep 18, 2022 | 8:33 AM

Ratnagiri Refinery : वेदांता फॉक्सकॉननंतर धोपेश्वरचा प्रकल्पही राज्याबाहेर जाणार की काय, अशी चर्चा होती. त्यातच विनायक राऊत यांनी या प्रकल्पाला 90 टक्के लोकांचा विरोध आहे, असं वक्तव्य केलं होतं. पण हे वक्तव्य चुकीचं असल्याची तक्रारही शिवसैनिकांनी आदित्य ठाकरेंकडे केली होती.

रत्नागिरी : रत्नागिरीतील (Ratnagiri) धोपेश्वर रिफायनरीबाबत (Dhopeshwar Refinery) महत्त्वाची बातमी हाती येतेय. राजापुरातील (Rajapur) प्रस्तावित प्रकल्पासाठी 7 गावातून संमतीपत्र मिळालंय. राजापूर तालुक्यातील बारसू, धोपेश्वर, पन्हळे, गोवळ, नाटे, वाडा तिवरे आणि वाडा पन्हेरे गावातील जागेची मोठ्या प्रमाणात प्रक्लपासाठी संमती मिळाळी आहे, अशी माहिती समोर आलीय. आत्तापर्यंत 2900 एकर जागेसाठी संमतीपत्र असल्याची माहिती समोर आलीय. तर रिफायनरीसाठी एकूण 5500 एकर जागेची आवश्यकता आहे. गेल्या काही दिवसांपासून धोपेश्वर रिफायनरी प्रकल्पाचा विषय चर्चेत आला होता. वेदांता फॉक्सकॉननंतर धोपेश्वरचा प्रकल्पही राज्याबाहेर जाणार की काय, अशी चर्चा होती. त्यातच विनायक राऊत यांनी या प्रकल्पाला 90 टक्के लोकांचा विरोध आहे, असं वक्तव्य केलं होतं. पण हे वक्तव्य चुकीचं असल्याची तक्रारही शिवसैनिकांनी आदित्य ठाकरेंकडे केली होती. गेल्या काही दिवसांपासून धोपेश्वर रिफायनरी प्रकल्प चर्चेत आल्यानंतर आता कोकणातील 7 गावांनी या प्रकल्पासाठी पाठिंबा दिल्याची महत्त्वपूर्ण बाब समोर आलीय.

VIDEO : Grampanchayat Election | 608 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी आज मतदान
Breaking : शिंदे-फडणवीस सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! सचिवांना दिलेले अधिकार पुन्हा मंत्र्यांकडे