नाऱ्या आडवा ये… ठाकरेंची टीका, नारायण राणेंनी प्रत्युत्तर देत काढली औकात

| Updated on: May 05, 2024 | 10:56 AM

कणकवलीच्या सभेतून उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंवर तिखट शब्दात प्रहार केलेत. तर या केलेल्या टीकेवरून नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर जोरदार प्रत्युत्तर दिलंय. तर उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांचा राजकीय सामना नेहमीच पाहायला मिळतो. बघा नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यात काय झाले आरोप-प्रत्यारोप?

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात नारायण राणे विरूद्ध उद्धव ठाकरे यांची शिवसेना असा सामना चांगलाच रंगताना दिसतोय. काल कणकवलीच्या सभेतून उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंवर तिखट शब्दात प्रहार केलेत. तर या केलेल्या टीकेवरून नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर जोरदार प्रत्युत्तर दिलंय. तर उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांचा राजकीय सामना काही नवा नाही. नारायण राणेंचा नाऱ्या असा उल्लेख करताना आडवा ये… तुला गाडून पुढे जाणार असं उद्धव ठाकरे म्हणाले. त्यावरून राणे आक्रमक होत त्यांनी असं म्हटलं की, ‘तुझी काय औकात. मी मनात आणलं तरी बरंच काही करू शकतं. त्यामुळे उभं आडवा भाषा करू नको.. पेशंट आहे तर पेशंटच रहा…माझ्या रस्स्त्यात येऊ नको. धमक्या देऊ नको… ‘, असा इशाराच त्यांनी दिला आहे. बघा नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यात काय झाले आरोप-प्रत्यारोप?

Published on: May 05, 2024 10:56 AM
अमित शाह ठाकरेंच्या विरोधात तर मोदी बाजूने? मोदींच्या मनात ठाकरेंबद्दल नेमकं काय?
शरद पवारांच्या सांगता सभेचं मैदान ५० वर्षात पहिल्यांदा बदललं, बारामतीत नेमकं काय घडलं?