प्रशासनाने ‘नवनीत राणांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष’ केल्याचा रवी राणांचा आरोप
खासदार नवनीत राणा यांची तुरुंगातून सुटका होताच त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मागील 12 दिवसापासून खासदार नवनीत राणा व त्याचे रवी राणा तुरुंगात होते. दरम्यान रवी राणांची पहिली प्रतिक्रिया समोर आलीये
मुंबई : खासदार नवनीत राणा ( Navneet Rana) यांची तुरुंगातून सुटका होताच त्यांना लीलावती रुग्णालयात (Lilawati Hospital) दाखल करण्यात आलं. मागील 12 दिवसापासून खासदार नवनीत राणा व त्याचे रवी राणा (Ravi Rana) तुरुंगात होते. दरम्यान रवी राणांची पहिली प्रतिक्रिया समोर आलीये ज्यात नवनीत राणांच्या आरोग्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा रवी राणांनी आरोप केलाय. गेल्या सहा दिवसांपासून नवनीत राणांना त्रास होत आहे. प्रशासनाने या सगळ्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्यांना दवाखान्यात दाखल केलं गेलं नाही. जेल प्रशासनाने या सगळ्याकडे दुर्लक्ष केलं, दखल घेतली नाही एका महिलेला अशा प्रकारची वागणूक देणं कितपत योग्य आहे. असं म्हणत आमदार रवी राणा यांनी प्रशासनावर आरोप केले आहेत.
Published on: May 05, 2022 07:18 PM