राणा दाम्पत्य खारमधील निवासस्थानी, पोलिसांकडून 149ची नोटीस

| Updated on: Apr 22, 2022 | 1:38 PM

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याचं आव्हान दिलं होतं. त्यानंतर शिवसैनिक अधिक आक्रमक झाले आहेत.

राज्यात सध्या मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालिसा पठणावरुन जोरदार राजकारण सुरु आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हा मुद्दा उचलल्यानंतर आता अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याचं आव्हान दिलं होतं. त्यानंतर शिवसैनिक अधिक आक्रमक झाले आहेत. रवी राणा यांनु गुरुवारी सांगितल्याप्रमाणे ते आज मुंबईत दाखल झाले आहेत. राणा दाम्पत्य सध्या मुंबईतील खार इथल्या आपल्या निवासस्थानी असल्याची माहिती आहे. मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ आयपीएस अधिकारी मंजुनाथ शिंदे यांनी राणा दाम्पत्याची भेट घेऊन त्यांना नोटीस बजावली आहे.

Hanumamn Chalisa: राणा दांपत्य नौटंकी दांपत्य
छत्तीसगडमधून कोळशाची खाण घेण्याचा विचार सुरू; कोळसा टंचाईवर अजित पवार यांची माहिती