रविकांत तुपकरांची पक्षातून हकालपट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कारवाई, कारण काय?

| Updated on: Jul 22, 2024 | 5:16 PM

'संघटना नेते रविकांत तुपकर घेत असलेल्या बैठकीविषयी आम्हाला माहिती नाही, त्यांना संघटनेने त्यांना लाल दिवा दिला, पद दिले, एकदा पक्ष सोडला परत आले, काम करत राहिले, अलीकडे तीन ऊस परिषदेत ते उपस्थितीत राहिले नाहीत, ते आमच्या नेतृत्वावर टीका करत आहेत'

रविकांत तुपकर यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिस्तपालन समितीने हा निर्णय घेतला असून रविकांत तुपकर यांच्यावर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. इतकंच नाहीतर रविकांत तुपकर यांच्यावर पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका आहे. संघटना नेते रविकांत तुपकर घेत असलेल्या बैठकीविषयी आम्हाला माहिती नाही, त्यांना संघटनेने त्यांना लाल दिवा दिला, पद दिले, एकदा पक्ष सोडला परत आले, काम करत राहिले, अलीकडे तीन ऊस परिषदेत ते उपस्थितीत राहिले नाहीत, ते आमच्या नेतृत्वावर टीका करत आहेत, असं शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील यांनी म्हटले. यापुढे रविकांत तुपकर आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना याचा काहीही संबंध असणार नाही. तुपकर विरोधात का बोलतात? तुपकर याची नाराजगी त्यांनी स्पष्ट करावी ते असं का वागले, असेही जालिंदर पाटील यांनी म्हटले.

Published on: Jul 22, 2024 05:16 PM
मराठा समाजातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, मुख्यमंत्र्यांनी काय घेतला निर्णय?
‘आम्ही दोघे राजीनामा देतो, तुम्ही राजकारणात या’, भाजप नेत्याचं जरांगें पाटलांना थेट आव्हान