‘शिंदेंनी हेलिकॉप्टरनेच खूप पैसे वाटले, उदय सामंत फक्त पैसे वाटायला होते’, कुणी केला गंभीर आरोप?
लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खूप पैसे वाटले, असं वक्तव्य करत रविकांत तुपकर यांनी गंभीर आरोप केले आहेत. तर मंत्री उदय सामंत हे फक्त पैसे वाटायला होते, असा खळबळजनक दावाही रविकांत तुपकर यांनी केला आहे. इतकंच नाहीतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीत हजारो कोटी रुपये वाटले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्येक मतदारसंघात २५ ते ३० कोटी रूपये वाटले, तर महायुतीत अजित पवार असून त्यांना पाडण्यासाठी शिंदेंची यंत्रणा काम करत होती, असं म्हणत संजय राऊत यांनी हल्लाबोल केला. यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेते नेते रविकांत तुपकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खूप पैसे वाटले, असं वक्तव्य करत रविकांत तुपकर यांनी गंभीर आरोप केले आहेत. तर मंत्री उदय सामंत हे फक्त पैसे वाटायला होते, असा खळबळजनक दावाही रविकांत तुपकर यांनी केला आहे. इतकंच नाहीतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीत हजारो कोटी रुपये वाटले. हेलिकॉप्टरने पैसेच घेवून फिरत होते आणि हेलिकॉप्टरनेच पैसे वाटले असल्याचे रविकांत तुपकर यांनी म्हटले आहे. तर महाराष्ट्रात माज, अहंकार खपवूस घेतला जात नाही असे म्हणत एकनाथ शिंदे यांचा या निवडणुकीत धुवा उडणार असल्याचे वक्तव्य करत त्यांनी निकालाची भविष्यवाणीच केली आहे.