‘ससूनच्या डीनला मंत्री हसन मुश्रीफ आणि देवेंद्र फडणवीस हे पाठिशी घालतायत’, कुणी केला गंभीर आरोप?

| Updated on: Nov 20, 2023 | 2:28 PM

पुण्यातील ससूनच्या डीनला मंत्री हसन मुश्रीफ आणि देवेंद्र फडणवीस हे पाठिशी घालतायत असा आरोप काँग्रेसच्या आमदाराने केला तर ससूनचा कर्मचारी महेंद्र शेवते सगळे व्यवहार बघायचा मग त्याला अटक करा, अटक केल्यानंतर ललीत पाटील प्रकरणासंदर्भात सगळे समोर येईल, असा मोठा दावाही कुणी केला?

पुणे, २० नोव्हेंबर २०२३ : पुण्यातील ससूनच्या डीनला मंत्री हसन मुश्रीफ आणि देवेंद्र फडणवीस हे पाठिशी घालतायत, असा गंभीर आरोप काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकर यांनी केलाय. तर ससूनचा कर्मचारी महेंद्र शेवते सगळे व्यवहार बघायचा मग त्याला अटक करा, अटक केल्यानंतर ललीत पाटील प्रकरणासंदर्भात सगळे समोर येईल, असा दावा रविंद्र धंगेकर यांनी केला. तर ललीत पाटील प्रकरणातील कारवाईचा आढावा देखील रविंद्र धंगेकर यांनी घेतला. ललीत पाटील याला अटक केल्यानंतर काही आरोपांसह दोन पोलिसांवर कारवाई करण्यात आली. तर ससून रूग्णालयाच्या डीनवर शासनाकडून जी कारवाई करण्यात आली त्यावरून रूग्णालयाचे डीन पदमुक्त झालेत, अशी माहिती आमदार रविंद्र धंगेकर यांनी पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेतल्यानंतर दिली.

Published on: Nov 20, 2023 02:28 PM
मर्दाच्या हातात भगवा शोभतो, ती ताकद संजय राऊत यांच्यात आहे का? कुणी केला सवाल?
संजय राऊत यांच्याकडून चंद्रशेखर बावनकुळे यांचा ‘तो’ फोटो शेअर अन् केला गंभीर आरोप; म्हणाले…