Ravindra Dhangekar : ‘ज्या दिवशी फॉर्म भरला त्या दिवशी विजय निश्चित झाला’- रविंद्र धंगेकर

| Updated on: Feb 26, 2023 | 12:34 AM

रविंद्र धंगेकर यांनी भाजपला टोला लगावला आहे. डोळ्यासमोर पराभव दिसतोय म्हणून ही पळवाट काढली जात आहे. मी ज्या दिवशी फॉर्म भरला त्याच दिवशी माझा विजय निश्चित झाला असल्याचं त्यांनी म्हटलंय.

पुणे : रविंद्र धंगेकरांनी भाजपला टोला लगावला आहे. ते म्हणाले की, डोळ्यासमोर पराभव दिसतोय म्हणून ही पळवाट काढली जात आहे. मी ज्या दिवशी फॉर्म भरला त्याच दिवशी माझा विजय निश्चित झाला आहे. हिंदुत्वाचा मुद्दा ही पळवाट आहे. मी ही हिंदू आहे माझ्याही गळ्यात भगवा आहे. ‘

रवींद्र धंगेकर म्हणाले की, चंद्रकांत पाटील गेली पाच वर्ष पुणे महापालिकेची तिजोरी सांभाळतात. ते काहीही बोलू शकतात कारण ते चंद्रकांत दादा आहेत. माझ्या प्रचारात त्यांनी साम दाम दंड या सगळ्या युक्त्या वापरल्या आहेत. ते गुन्हेगारांना गाड्या घेऊन फिरत आहेत. भारतीय जनता पार्टीचे लोक माझ्या कार्यकर्त्यांना धमकावत आहेत.

चंद्रकांत पाटलांना सगळी वक्तव्य माफ आहेत कारण ते आता राजे आहेत. पुणे महानगरपालिकेची तिजोरी गेली पाच वर्षे कोणी धुवून खाल्ली याचा हिशोब त्यांनी द्यावा. हेमंत रासने यांनी पुणे महापालिकेच्या तिजोरीतला पैसा घरी आणि चंद्रकांत पाटलांच्या पाकिटात पोहोचवले. हेमंत रासने यांची उमेदवारी ही टक्क्याची उमेदवारी आहे.  ही टक्केवारी थेट चंद्रकांत पाटलांच्या खिशात गेली आहे. गिरीश बापट यांना प्रचारात आणणे दुर्दैवी असल्याचं देखील त्यांनी म्हटलं होतं.

( राज्यातील आणि जगभरातील ताज्या बातम्या मराठीत ( Marathi News ) वाचण्यासाठी Tv9 Marathi च्या वेबसाईटला फॉलो करत राहा. महत्त्वाच्या बातम्या ( Latest Marathi news ) सर्वात आधी तुम्हाला पाहण्यासाठी आमच्या TV9 marathi Live या Youtube चॅनेलला फॉलो करा. )

Published on: Feb 24, 2023 01:02 AM
Ajit Pawar On Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर अजित पवार यांचा टोला
चित्रा वाघ यांच्या ‘त्या’ ट्विटवर काँग्रेसचे नेते उस्मान हिरौली यांचं स्पष्टीकरण