संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना धृतराष्ट्र बनवले, कुणी केला जोरदार हल्लाबोल

| Updated on: Jun 05, 2023 | 6:38 AM

VIDEO | राजकीय वातावरण ढवळून निघाले असताना संजय राऊत यांच्यावर 'या' नेत्यानं केली बोचरी टीका

सोलापूर : गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने असताना सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांवर तर विरोधकांकडून आरोप प्रत्यारोप केले जात आहे. अशातच पुन्हा एकदा रयत क्रांतीचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना धृतराष्ट्र बनवले असल्याचा घणाघात त्यांनी त्यांच्यावर केला आहे. यावेळी त्यांना सांगितले की, हातकणंगले आणि माढा लोकसभा मतदारसंघाच्या जागा आपण भाजपाकडे मागणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सदाभाऊ खोत यांनी यावेळी खासदार संजय राऊत आणि महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. महाभारतामध्ये संजय आणि धृतराष्ट्राला रणांगणावरील माहिती देण्याचे काम केले होते, मात्र आता कलियुगात संजय राऊत चांगले असणाऱ्या उद्धव ठाकरे यांना धृतराष्ट्र बनवत आहेत अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याची बोचरी टीका माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी राऊत यांच्यावर केली आहे.

Published on: Jun 05, 2023 06:35 AM
सुधीर मुनगंटीवार यांचे नेमकं असं दुःख काय की नाना पटोले म्हणाले, त्यांच्या दुःखात सामील…
मुंबई महापालिकेसाठी महायुतीचं मिशन 151 पण भाजपचे येणार फक्त 28 नगरसेवक?