शिंदे-फडणवीस सरकारकडून प्रशासनात कोणते झाले महत्वाचे मोठे बदल?
VIDEO | राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या पुन्हा बदल्या, शिंदे-फडणवीस सरकारकडून कोणता झाला निर्णय?
मुंबई : राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या पुन्हा बदल्या करण्यात आल्या आहेत. शिंदे-फडणवीस सरकारकडून प्रशासनात महत्वाचे आणि मोठे बदल करण्यात आल्याचे समोर आले आहे. मनीषा म्हैसकर पीडब्लूडी विभागात अतिरिक्त मुख्य सचिव पद देण्यात आले आहे. अनिल डिग्गीकर यांची सिडकोच्या उपाध्यपदाची जबाबदारी सोपावण्यात आली आहे. तर डॉ. संजय मुखर्जी यांच्याकडे एमएमआरडीची जबाबदारी देण्यात आली आहे. दरम्यान, राज्यातील राजकीय वर्तुळात अनेक आरोप प्रत्यारोप सुरू असताना अचानक शिंदे-फडणवीस सरकारकडून प्रशासनात महत्वाचे आणि मोठे बदल करण्यात आल्याने चर्चांना उधाण आले आहे.
Published on: Jun 04, 2023 01:39 PM