कसबा पोटनिवडणुकीतील पराभवानंतर भाजपचे उमेदवार हेमंत रासने म्हणाले, ‘माझा पराभव…’
VIDEO | कसबा पोटनिवडणुकीतील पराभवानंतर भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांची प्रतिक्रिया, बघा काय म्हणाले
पुणे : कसबा मतदारसंघात भाजपचा मोठा पराभव झाला आहे. कसबा मतदारसंघात काँग्रेसचे रवींद्र धंगेकर विजयी झाले असून रवींद्र धंगेकर यांचा 11 हजार 40 मताधिक्यांनी विजय झाला आहे. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपचे हेमंत रासने यांना पराभूत केलं आहे. त्यामुळे भाजपसाठी हा मोठा दणका मानला जात आहे. या पराभवानंतर भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांनी टीव्ही ९ मराठीला आपली प्रतिक्रिया दिली आहे. उमेदवार म्हणून हा माझा पराभव आहे. पक्षाने माझ्यावर जो विश्वास दाखवला, पण जनतेचा विश्वास मी विजयापर्यंत पोहचवण्यास अपयशी ठरलो. हा झालेला पराभव मी मान्य करतो, मी कुठे कमी पडलो याचे आत्मचिंतन करू, असे म्हणत हेमंत रासने यांनी त्यांचा पराभव मान्य केला आहे.
Published on: Mar 02, 2023 02:33 PM