‘राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही, कारण…’, ठाकरे गटाच्या ‘या’ दोन नेत्यांचा मोठा दावा

| Updated on: Jun 06, 2023 | 3:18 PM

VIDEO | राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार लवकर होणार अशी चर्चा सुरू असतांना ठाकरे गटाच्या नेत्यांच्या वक्तव्यानं खळबळ

मुंबई : राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही, असे ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांनी हा दावा केला आहे. तर मंत्रिमंडळ विस्तारासाठी आता फक्त हाणामारी होणं बाकी असल्याचे म्हणत चंद्रकांत खैरे यांनी शिंदे फडणवीस सरकारला खोचक टोला लगावला आहे. याशिवाय मंत्रिमंडळ विस्ताराला कोणताही मुहूर्त लागणार नसल्याचे भाकित अंबादास दानवे यांनीही वर्तविले आहे. सत्ताधारी पक्षांना आमदार पळून जाण्याची भीती असल्याने मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही. सरकारकडून फक्त वेळकाढूपणा केला जाईल, असा दावाही अंबादास दानवे यांनी केला आहे. पुढे ते असेही म्हटले की, ‘मंत्री न झाल्याने अनेकांना राग येईल, त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळ विस्तार करणार नाही. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराला कोणताही मुहूर्त लागणार नाही’, असे वक्तव्य ठाकरे गटाचे नेते आणि विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केले. तर अंबादास दानवे यांच्यासह चंद्रकांत खैरे यांनी केलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरील विधानानं चर्चांना उधाण आले आहे.

Published on: Jun 06, 2023 03:18 PM
टक्केवारीच्या आरोपानंतर ठाकरे गटाच्या नेत्यानं भुमरे यांना पुन्हा डिवचलं; म्हणाला, ‘कोण भुमरे?’ ‘टिनपाट माणूस ..’
दिपाली सय्यद यांचा संजय राऊत यांच्यावर निशाणा; म्हणाल्या, ‘राऊतांना डॉक्टरची…’