VIDEO : Mumbai Rape Case | बलात्कार पीडितेचा मृत्यू; श्वेता महाले, नसिम खान, भाई जगताप यांच्या प्रतिक्रिया
साकीनाका बलात्कार प्रकरणातील महिलेचा मृत्यू झाला आहे. या घटनेतील आरोपीला लवकरात लवकर शिक्षा मिळावी म्हणून फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला चालवण्याची मागणी करण्यात येत आहे. मोहन चौहान या नराधमाने महिलेवर बलात्कार केला होता. बलात्कारानंतर प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने या महिलेचा मृत्यू झाला होता.
साकीनाका बलात्कार प्रकरणातील महिलेचा मृत्यू झाला आहे. या घटनेतील आरोपीला लवकरात लवकर शिक्षा मिळावी म्हणून फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला चालवण्याची मागणी करण्यात येत आहे. मोहन चौहान या नराधमाने महिलेवर बलात्कार केला होता. बलात्कारानंतर प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने या महिलेचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर तिच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, तीन दिवस सुरू असलेली तिची मृत्यूची झुंज अखेर अपयशी ठरली. महिलेचा मृत्यू झाल्यानंतर डीसीपी आणि एसपींनी तात्काळ राजावाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. राजावाडी पोलीस ठाण्याबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आता या प्रकरणावर श्वेता महाले, नसिम खान, भाई जगताप यांनी प्रतिक्रिया दिल्या.