Amit Deshmukh | नाट्यगृहांना अटी शर्ती घालून सुरु करण्याबाबत तयार, मात्र टास्क फोर्सचं मत महत्त्वाचे
काही अटी शर्ती घालून सुरू करण्याबाबत आम्ही तयार आहोत, पण हा निर्णय सांस्कृतिक विभाग स्तरावर होत नाही टास्क फोर्स यांचं मत महत्वाचे आहे. आपत्ती निवारण मत देखील आहे. घाई करून काही निर्णय घेत नाही, चर्चा करत आहोत आणि अभ्यापूर्वक पावलं उचलली पाहिजेत.
काही अटी शर्ती घालून सुरू करण्याबाबत आम्ही तयार आहोत, पण हा निर्णय सांस्कृतिक विभाग स्तरावर होत नाही टास्क फोर्स यांचं मत महत्वाचे आहे. आपत्ती निवारण मत देखील आहे. घाई करून काही निर्णय घेत नाही, चर्चा करत आहोत आणि अभ्यापूर्वक पावलं उचलली पाहिजेत. नाट्यगृह,सिनेमा हे बंद असतात व्हेंटिलेशन नसत, आम्ही परवानगी दिली तिथे हजारो लोक येणं हे संयुक्तिक ठरत नाही. मुख्यमंत्र्यांची चर्चा सुरू आहे. भावनेशी सहमत आहोत हे सुरु करावं तर करावं का,
पण भावनेला मर्यादा घालावी लागते. एखादा उद्योग अडचणीत आहे ते सुरू व्हावं का तर हो, पण जीव धोक्यात घालून करावं का? तर नाही. नाईलाजाने कठोर पावले उचलावी लागतात, असे सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख म्हणाले.