Video : ‘फुकट पगार घेता का %$@#$#’ आणि संतोष बांगर भडकले, फोनवरुनच अधिकाऱ्याला झापले

| Updated on: Aug 31, 2022 | 7:31 PM

जरा ध्यान जाग्यावर ठेवून काम करायचं, असं त्यांनी यावेळी पडलं. पगार कसा घेता, काम करताना हिसाबात काम करा, अशा शब्दांत त्यांनी अधिकाऱ्याला यावेळी सुनावलं. 102 वाल्यांचा विषय तातडीने मार्गी लावा, कंत्राटं रद्द करुन टाका, अजिबात तो विषय नाही राहिला पाहिजे, असंही ते यावेळी फोनवर म्हणाले.

हिंगोलीचे शिवसेना बंडखोर आमदार संतोष बांगर (Santosh Bangar Call recording) यांचा एक व्हिडीओ कॉल व्हायरल झाला आहे. संतोष बांगर यांनी एका आरोग्य अधिकाऱ्याला फोनवरुन चांगलंच झापलं. सरकारचे पगार फुटक घेताय का? असा सवालही यावेळी संतोष बांगर यांनी यावेळी आरोग्य अधिकाऱ्याला विचारलाय. मीटिंगमध्ये असल्यानं फोन कॉल उचलू शकलो नाही, असं आरोग्य अधिकाऱ्याने संतोष बांगर यांना म्हटलं. त्यावर संतोष बांगर (MLA Santosh Bangar) चांगलेच संतापले. लोकप्रतिनिधींचा फोन घेत नाही, यावरुन त्यांनी सगळा राग आरोग्य अधिकाऱ्यावर (Health Department Officer) काढला. जरा ध्यान जाग्यावर ठेवून काम करायचं, असं त्यांनी यावेळी पडलं. पगार कसा घेता, काम करताना हिसाबात काम करा, अशा शब्दांत त्यांनी अधिकाऱ्याला यावेळी सुनावलं. 102 वाल्यांचा विषय तातडीने मार्गी लावा, कंत्राटं रद्द करुन टाका, अजिबात तो विषय नाही राहिला पाहिजे, असंही ते यावेळी फोनवर म्हणाले. दरम्यान, हा सगळा विषय आपण मुख्यमंत्र्यांना सांगणार आहोत, असा इशाराही त्यांनी यावेळी अधिकाऱ्याला दिला.

Published on: Aug 31, 2022 07:31 PM
लालबागच्या राजाच्या मंडपात भाविकांना धक्काबुक्की! पाहा व्हिडीओ, महिला भाविक आणि सुरक्षा रक्षकांमध्ये वाद
gulabrao patil | ‘शिंदे गटात सहभागी होताना सर्वच देव आठवले होते’ गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया