सबळ पुरावा असला तरच ED अटक करु शकते, Nawab Malik यांच्या अटकेवर Ujjwal Nikam यांची प्रतिक्रिया
खरेच एखाद्याला ईडी चौकशीसाठी नोटीस देणे बंधनकारक आहे का? कायदा नेमके काय सांगतो, या साऱ्या प्रकरणावर ज्येष्ठ विज्ञीज्ञ उज्ज्वल निकम यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद झाला. कायद्यातले बारकावे सामन्यांना समजतील अशा भाषेत समजावून सांगितले.
मुंबईः महाविकास आघाडीतील अल्पसंख्याक कल्याण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांची ईडीने (ED) चौकशी सुरू केल्याने आरोप-प्रत्यारोपाला जोर आलाय. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या चौकशीला आक्षेप घेत मलिकांना अगोदर नोटीस देणे बंधनकारक होते. त्यानंतर चौकशीला बोलावले पाहिजे होते, असा दावा केलाय. खरेच एखाद्याला ईडी चौकशीसाठी नोटीस देणे बंधनकारक आहे का? कायदा नेमके काय सांगतो, या साऱ्या प्रकरणावर ज्येष्ठ विज्ञीज्ञ उज्ज्वल निकम यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद झाला. कायद्यातले बारकावे सामन्यांना समजतील अशा भाषेत समजावून सांगितले.