Breaking | कोरोना मृतांच्या नातेवाईकांना मदत मिळणार, महाराष्ट्र राज्य सरकारचा मोठा निर्णय

Breaking | कोरोना मृतांच्या नातेवाईकांना मदत मिळणार, महाराष्ट्र राज्य सरकारचा मोठा निर्णय

| Updated on: Nov 26, 2021 | 9:01 PM

सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 4 ऑक्टोबर 2021 रोजी दिलेल्या निर्णयानुसार कोविड-19 या आजाराने निधन पावलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना 50 हजार रुपये सानुग्रह सहाय्य देण्याची घोषणा सरकारने केली आहे.

मुंबई : राज्यात कोरोना संसर्गामुळे हजारो रुग्णांचा मृत्यू झाला. काम करणारी तसेच कुटुंबप्रमुख व्यक्तींचा या कोरोना महामारीमध्ये मृत्यू झाला. अनेक कुटुंबं उघड्यावर आली. मागील अनेक दिवसांपासून कोरोनामुळे मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना मदत देण्यात यावी अशी मागणी केली जात होती. आता या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 4 ऑक्टोबर 2021 रोजी दिलेल्या निर्णयानुसार कोविड-19 या आजाराने निधन पावलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना 50 हजार रुपये सानुग्रह सहाय्य देण्याची घोषणा सरकारने केली आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून हा निधी देण्यात येईल.

23 वर्षात नवसासाठी जमवलेल्या कोंबड्यांमुळे सरकार पडण्याचा भाकीतं राणेंना करावी लागतात- नवाब मलिक
Anil Parab | संप मागे घ्या, कामावर या आणि एसटी सुरु करा, अनिल परब यांचं एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन