Mumbai | मुंबईत विविध विभागांना शिथिलता, आजपासून मैदान,उद्यानं,चौपाट्या सुरु

| Updated on: Aug 16, 2021 | 1:38 PM

गेले कित्येक महिने निर्बंधात राहून कंटाळलेल्या मुंबईकरांना आजपासून मोठा दिलासा मिळाला आहे. कारण आजपासून मुंबईतील सर्व मैदाने, उद्याने, चौपट्या, समुद्र किनारे खुली झाली आहेत. सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत या सर्व गोष्टी खुल्या ठेवण्याचा निर्णय बृहन्मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे.

गेले कित्येक महिने निर्बंधात राहून कंटाळलेल्या मुंबईकरांना आजपासून मोठा दिलासा मिळाला आहे. कारण आजपासून मुंबईतील सर्व मैदाने, उद्याने, चौपट्या, समुद्र किनारे खुली झाली आहेत. सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत या सर्व गोष्टी खुल्या ठेवण्याचा निर्णय बृहन्मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. परंतु हा निर्णय घेताना महापालिकेने नियम आणि अटींचं बंधन घातलं आहे, जे नागरिकांना पाळावं लागणार आहे. मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि इतर उपाययोजना अनिवार्य राहतील.

कोव्हिडची दुसरी लाट आटोक्यात येत आहे. च्याच अनुषंगाने ब्रेक द चेन अंतर्गत आपण मुंबईत शिथिलता देत असल्याचं महापालिकेने म्हटलं आहे. मैदाने, उद्याने, चौपट्या, समुद्र किनारे सुरु राहतील पण यांसाठी वेगवेगळे नियम करण्यात आले आहेत, जे नियम पाळणं नागरिकांना अनिवार्य असेल.

Pankaja Munde | घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांवर पंकजा मुंडे संतापल्या
Fast News | महत्त्वाच्या घडामोडी | 16 August 2021