Vijay Wadettiwar | अलमट्टीमधील विसर्ग वाढवल्यानं धोका कमी झाला : विजय वडेट्टीवार
ज्यांचा मृत्यू झाला आहे त्यांना 5 लाखांची मदत देणार, तसेच काही गावांचे पुर्नवसन केले जाणार. कायमस्वरूपी काही निर्णय घ्यावे लागणार आहेत, असे मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आयोजित पत्रकार परिषदेत जाहीर केले.
सांगली : अलमट्टी धरणाच्या व्यवस्थापनासाठी स्वतंत्र अधिकारी नेमला आहे. महाड आणि चिपळूणमध्ये 30 फुटांपर्यंत पाणी होते. दरडी कोसळल्यामुळे मृतांची संख्या जास्त आहे. लोकांचं न भरून येणारं नुकसान झालं आहे. सांगलीमध्ये आपत्ती व्यवस्थपनाची स्वतंत्र यंत्रणा उभी करणार. एनडीआरएफच्या धर्तीवर प्रत्येक जिल्ह्यात तुकड्या तयार करणार आहे. 2019 च्या जीआर प्रमाणे मदत देणार आहोत. ज्यांचा मृत्यू झाला आहे त्यांना 5 लाखांची मदत देणार, तसेच काही गावांचे पुर्नवसन केले जाणार. कायमस्वरूपी काही निर्णय घ्यावे लागणार आहेत, असे मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आयोजित पत्रकार परिषदेत जाहीर केले.