Pune | पुण्यात PMPML च्या प्रवाशांना दिलासा, तिकीट दरवाढ टाळण्याच्या महापौरांच्या सूचना

| Updated on: Sep 03, 2021 | 2:16 PM

पुण्यातील पीएमसी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा देणारी बातमी आहे.पुणे महानगर परिवहन महामंडळ लि.च्या संचालक मंडळाच्या बैठकीत दैनंदिन आणि मासिक पासेसच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला असून याची अंमलबजावणी ७ सप्टेंबरपासून केली जात आहे.

पुण्यातील पीएमसी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा देणारी बातमी आहे.पुणे महानगर परिवहन महामंडळ लि.च्या संचालक मंडळाच्या बैठकीत दैनंदिन आणि मासिक पासेसच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला असून याची अंमलबजावणी ७ सप्टेंबरपासून केली जात आहे. तर दुसरीकडे तिकीट दरवाढ करण्याचा पीएमपीएमएल प्रशासनाचा निर्णयही रद्द करण्यात आला असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. पासेसचे दर कमी करण्यासंदर्भात आणि दरवाढ टाळण्यासाठी महापौर मोहोळ यांनी आग्रही सूचना केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

Sidharth Shukla | सिद्धार्थ शुक्लाचं पार्थिव रवाना LIVE
Solapur | सोलापुरात सलायनमध्ये निघालं झुरळ,रुग्णांच्या आरोग्याबाबत हलगर्जीपणा