मशिदीवरील भोंग्याचा वाद पुन्हा पेटला! …तर आम्हीही भोंगे लावू, मनसेचा आता थेट इशारा
मशिदींवरील भोंग्याचा वाद पुन्हा पेटला... रत्नागिरीत मनसे आक्रमक थेट दिले आव्हान अन् म्हणाले मशिदीवरील भोंगे हटवा, नाही तर...
मशिदीवरील भोंग्याचा वाद पुन्हा एकदा पेटल्याचे पाहायला मिळत आहे. रत्नागिरीमध्ये मनसेने मशिदीवरील भोंग्याच्या संदर्भात आक्रमक भूमिका घेत थेट इशारा दिला आहे. आता मनसेने पोलीस प्रशासनाला अल्टिमेटम देत एक तर मशिदीवरील भोंगे काढा नाही तर हनुमान चालिसा सुरू करण्याची परवानगी द्या, अशी मागणी केली आहे.
यासंदर्भात बोलताना मनसे पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर संपूर्ण देशात मशिदींवरील भोंग्याना आवाजाची मर्यादा निश्चित केली असताना रत्नागिरीतील मशिदींवर कर्कश आवाज आहे. हे निदर्शनास येताच रत्नागिरीतील मनसेकडून पोलीस प्रशासनाला एक पत्र देण्यात आले आहे. या पत्रात मनसेने ज्या मशिदींवर अद्याप भोंगे आहेत, ते काढावे अन्यथा जागो-जागी हनुमान चालीसा लावण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी मनसेने आक्रमक भूमिका घेत पोलीस प्रशासनाकडे केली आहे.