‘तेव्हा भाजपचे नेते भुंकतही नव्हते’, ठाकरेंच्या या टीकेवर फडणवीस यांनी दिलं चोख प्रत्युत्तर
VIDEO | उद्धव ठाकरे यांनी वज्रमूठ सभेतून बाबरीबाबत केलेल्या 'त्या' टीकेवर देवेंद्र फडणवीस यांचं प्रत्युत्तर, काय म्हणाले बघा
मुंबई : महाविकास आघाडीची काल १ मे रोजी मुंबईतील बीकेसी येथे वज्रमूठ जाहीर सभा झाली. यासभेत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर सडकून टीका केली. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील विरोधकांना फटकारल्याचे पाहायला मिळाले. इतकेच नाही तर बाबरीच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले, बाबरी पडली तेव्हा भाजपचे नेते भुंकतही नव्हते. तर यावर उद्धव ठाकरेंच्या या टीकेवर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. बाबरी पडत होती तेव्हा उद्धव ठाकरे कुठे होते, असे म्हणत फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना प्रतिसवाल केला आहे. ‘मी भाजपचा कार्यकर्ता बाबरी जेव्हा पडत होती तेव्हा तिथे होतो. माझ्यासह भाजपचे हाजारो कार्यकर्तेही होते. उद्धव ठाकरे यांनी एका कार्यकर्त्यांचं नाव सांगावं, ते स्वतः मुंबईच्या बाहेर पडले नाहीत. आम्ही स्वतः तिथे लढलो ‘, असे म्हणत फडणवीस यांनी वज्रमूठमधून उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेवर उत्तर दिले आहे.