Bacchu Kadu यांना कुणाचा खोचक सल्ला? म्हणाले, ‘सत्तेत नसल्यामुळे नैराश्य आलंय, चांगल्या डॉक्टरची ट्रीटमेंट घ्या’

| Updated on: Sep 24, 2023 | 9:32 AM

VIDEO | अजित दादांकडे 50 आमदार आहेत त्यामुळे अजितदादा पवार आज ना उद्या मुख्यमंत्री होतीलच, परंतु तुम्ही सत्तेत नसल्यामुळे तुम्हाला नैराश्य आलंय, आमदार बच्चू कडू यांच्यावर कुणाची सडकून टीका?

मुंबई, २४ सप्टेंबर २०२३ | आमदार बच्चू कडू अजितदादा पवार आज ना उद्या मुख्यमंत्री होतीलच, परंतु तुम्ही सत्तेत नसल्यामुळे नैराश्य आले आहे, चांगल्या डॉक्टरची ट्रीटमेंट घ्या, असे म्हणत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी बच्चू कडू यांना खोचक टोला लगावला आहे. आमदार बच्चू कडू राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या विषयी बोलताना म्हणाले, अजित दादा मुख्यमंत्री झाल्यास भाजपाला परिणाम भोगावे लागतील परंतु बच्चू कडू अजितदादा राज्याचे मुख्य आणि महत्वाचे नेते आहेत आणि दादांकडे 50 आमदार आहेत त्यामुळे दादा आज ना उद्या मुख्यमंत्री होणारच आहेत परंतु राज्यातील जनतेला चांगलेच माहित आहे, तुम्ही सत्तेतून बाहेर फेकले गेल्यामुळे अस्वस्थ झाला आहात आणि नैराश्य आल्यामुळे तुम्ही अशी विधाने करत आहात त्यामुळे तुम्ही एखादा चांगला डॉक्टरची ट्रीटमेंट घ्या, असे म्हणत सचिन खरात यांनी सडकून टीका केली आहे.

Published on: Sep 24, 2023 09:32 AM
सरकारी शाळांचं होणार खासगीकरण? 62 हजार सरकारी शाळा कंपन्यांना दत्तक जाणार?
‘त्या’ घोटाळेबाजांना योग्य शिक्षा मिळावी, नाव न घेता किरीट सोमय्या यांचा कुणावर निशाणा?