‘विजय शिवतारे तुम्ही कितीही हात-पाय आपटा, पवारांवर टीका करा; पण…’ कुणी दिला इशारा
VIDEO | 'तुम्हाला अजित दादा पुरंदर मधून कधीच आमदार होऊ देणार नाही', पुरंदर विधानसभा मतदारसंघातील जागेवरुन विजय शिवतारे यांनी कुणी दिली थेट इशारा
मुंबई : शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांच्यावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी जोरदार हल्लाबोल चढवला आहे. शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे सतत प्रसिद्ध झोतात राहण्यासाठी आणि परत एकदा पुरंदर विधानसभा मतदारसंघातून आमदार बनण्यासाठी पवार घराण्यावर सतत टीका करत असतात. आज विजय शिवतरे म्हणाले, शरद पवार हे सहकारकारातले घुसखोर, परंतु विजय शिवतारे जी तुमचे शिंदे गटाचे वरिष्ठ नेते आनंदराव अडसूळ म्हणाले आदरणीय शरद पवार सहकार क्षेत्राचे आधारस्तंभ आहेत त्यामुळे तुम्हाला शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते आनंदराव अडसुळे यांचे वक्तव्य मान्य नाही असे दिसत आहे. त्यामुळे तुम्ही शिंदे गटातून तात्काळ बाहेर पडावं आणि राहिला प्रश्न तुमच्या आमदारकीचा तुम्ही कितीही हात पाय आपटा तरीही तुम्हाला कधीच अजित दादा पुरंदर विधानसभा मतदारसंघातून आमदार होऊ देणार नाही हे ध्यानात ठेवा, असा इशाराही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी दिला.