‘मराठा आंदोलनाची भेट म्हणजे राज ठाकरे यांची चमकोगिरी’, कुणाचा हल्लाबोल?

| Updated on: Sep 07, 2023 | 12:38 PM

VIDEO | मराठा समाजाच्या भेटीचं राज ठाकरे यांनी नाटक करु नये, ते आरक्षणाच्या विरोधात आहेत की, आरक्षणाच्या बाजूने आहे, राज ठाकरे यांनी नेमकी त्यांची भूमिका स्पष्ट करावी, कोणी केली टीका?

जळगाव, ७ सप्टेंबर २०२३ | मराठा समाजाच्या आंदोलकांची भेट घेत काही राजकीय पक्ष चमकोगिरी करत असल्याची टीका आरपीआय खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी जळगावात केली आहे. राज ठाकरे यांनी वर्षानुवर्ष बहुजन समाजातील सर्व जातींच्या आरक्षणाला विरोध केला आहे. तेच राज ठाकरे मराठा समाजाच्या आंदोलकांची भेट घेत आहेत, राज ठाकरे ते आरक्षणाच्या विरोधात आहेत की, आरक्षणाच्या बाजूने आहे, राज ठाकरे यांनी नेमकी त्यांची भूमिका स्पष्ट करावी, मराठा समाजाच्या भेटीचं राज ठाकरेंनी नाटक करु नये, असे म्हणत सचिन खरात यांनी खळबळजनक वक्तव्य करत राज ठाकरे यांच्यावर सुध्दा टीकास्त्र सोडले आहे. जितनी उनकी संख्या उतनी ऊनकी भागिदारी असे म्हणत मराठा समाजासमाजाबरोबरच मुस्लिम तसेच ओबीसी समाजाला सुध्दा आरक्षण मिळावे अशी मागणी रिपिब्लिकन आरपीआय खरात गटाचे सचिन खरात यांनी केली आहे, सचिन खरात हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत, यादरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधतांना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर टीका केली आहे.

Published on: Sep 07, 2023 12:38 PM
Sanjay Raut यांनी मराठा आंदोलनावरून शिंदे सरकारला फटकारलं; म्हणाले, ‘… गंडवागंडवी करू नका’
Balasaheb Thorat यांचा हल्लाबोल, ‘भाजपनं खोटेनाटे आश्वासन दिले अन् सत्तेत जाऊन बसले’