पाण्याच्या शोधात शिवारात घुसला बिबट्या, विहिरीत पडला अन्…
भंडाऱ्यातील लाखांदूर तालुक्यात असलेल्या पारडी येथे पाणी आणि शिकारीच्या शोधात शेतशिवारातं बिबट्या घुसला होता. यावेळी पाणी आणि शिकारीच्या शोधात पोहोचलेला बिबट्या शेतातील कठडे नसलेल्या विहिरीत पडला. लाखांदूर वन विभाग आणि एनएनटीआरच्या बचाव पथकाकडून कसं केलं बिबट्याला रेस्क्यू बघा...
भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यात असलेल्या पारडी या गावात विहिरीत बिबट्या पडल्याची माहिती समोर येत आहे. भंडाऱ्यातील लाखांदूर तालुक्यात असलेल्या पारडी येथे पाणी आणि शिकारीच्या शोधात शेतशिवारातं बिबट्या घुसला होता. यावेळी पाणी आणि शिकारीच्या शोधात पोहोचलेला बिबट्या शेतातील कठडे नसलेल्या विहिरीत पडला. या घटनेनंतर शेतातचं घर असल्यानं विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेलेल्या एका महिलेला बिबट्या विहिरीत पडल्याची बाब लक्षात आली. ही घटना लाखांदूर वन विभागाच्या अखत्यारीत असलेल्या पारडी येथे घडली असून माहिती मिळताच लाखांदूर वन विभाग आणि एनएनटीआरच्या बचाव पथकाने विहिरीतील बिबट्याला रेस्क्यू करीत सुखरूप बाहेर काढून त्याला जंगल परिसरात सोडले. बघा व्हिडीओ…
Published on: May 21, 2024 11:09 AM