अशोक सराफ तुझे सख्खे मामा लागतात का? कशासाठी ही आपुलकी… राज ठाकरे का भडकले?
आपला मोठेपणा आपण जपला पाहिजे. तुम्ही इतरांना मोठं म्हटलं पाहिजे. दुसऱ्यांनी तुम्हाला मोठं म्हटलं पाहिजे. पण आज तुम्ही एकमेकांना ज्या छोट्या नावांनी, शब्दांनी हाका मारताय, हे इतर लोकांसमोर होता कामा नये, असे म्हणत राज ठाकरे यांनी मराठी कलाकारांना फैलावरच घेतले
पुणे, ७ जानेवारी, २०२४ : अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी त्यांनी मराठी कलाकारांची चांगलीच शाळा घेतली. राज ठाकरे म्हणाले, तुम्ही जर एकमेकांना मान दिला तरच तुम्हाला लोकांकडून मान मिळेल नाहीतर तो मान तुम्हाला मिळणार नाही. आपला मोठेपणा आपण जपला पाहिजे. तुम्ही इतरांना मोठं म्हटलं पाहिजे. दुसऱ्यांनी तुम्हाला मोठं म्हटलं पाहिजे. पण आज तुम्ही एकमेकांना ज्या छोट्या नावांनी, शब्दांनी हाका मारताय, हे इतर लोकांसमोर होता कामा नये, असे म्हणत राज ठाकरे यांनी मराठी कलाकारांना फैलावरच घेतल्याचे पाहायला मिळाले. मागे एकदा अशोक सराफांच्या कार्यक्रमाला गेलो होतो, त्यांना मी सरच म्हणतो. ही सर म्हणण्यासारखीच माणसे. यांना सर म्हणायचे नाही तर पब्लिकली मामा आले का? म्हणायचे. सख्खे मामा लागतात का ते तुझे ? इतका मोठा कलावंत आहे ना म्हणाणा सर असे म्हणत राज ठाकरे यांनी मराठा कलाकारांना ठणकावले.