निवृत्त पोलिसाच्या मुलाची निर्घृणपणे हत्या, कुठं घडली धक्कादायक घटना?

| Updated on: Sep 29, 2023 | 10:54 PM

VIDEO | निवृत्त पोलिसाच्या मुलाची निर्घृणपणे हत्या, एका टोळक्यानं केला वार; विजय ढुमे असं हत्या करण्यात आलेल्या निवृत्त पोलिसाच्या मुलाचं नाव, विजय ढुमे हे सिंहगड रोड परिसरातील लाँजमधून बाहेर येत असताना एका टोळक्याने त्यांच्यावर केला हल्ला. आरोपींनी ही हत्या का केली? पोलीस घेणार तपास

पुणे, २९ सप्टेंबर २०२३ | पुण्यात आज एका निर्घृण हत्येनं एकच खळबळ उडाली आहे. एका निवृत्त पोलिसाच्या मुलाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. सिंहगड रोड पोलीस ठाण्यात संबंधित हत्येची घटना घडली आहे. विजय ढुमे असं हत्या करण्यात आलेल्या निवृत्त पोलिसाच्या मुलाचं नाव असून ते सिंहगड रोड परिसरातील एका लाँजमधून बाहेर येत होता. यावेळी एका टोळक्याने त्यांच्यावर हल्ला केला. विजय ढुमे लाँजमध्ये गेल्यानंतर आरोपींचं टोळकं तिथे दबा धरुन बसला होता. विजय बाहेर येताच दबा धरुन बसलेल्या टोळक्याने हल्ला यावेळी त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान सिंहगड रोड परिसरातील पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरु करण्यात आला आहे. आरोपींनी ही हत्या का केली? याचा तपास पोलिसांकडून सुरू कऱण्यात आला आहे.

Published on: Sep 29, 2023 10:48 PM
‘ज्या घराण्याकडून मुंबईचा द्वेष, त्यांची चाकरी तुम्ही करताय’, शिवसेना नेत्याचा संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल
‘तरूणांचं भविष्य उद्धवस्त करण्याचा सरकारचा विडा’, कुणाची टीका?