दुर्गादेवी कोकण कड्यावरील उलटा धबधबा प्रवाहित
जुन्नरमधील कोकण कड्यावरून उलटा धबधबा प्रवाहित झाला आहे. आंबे हातविज परिसरात दुर्गादेवी कोकण कडा आहे.
जुन्नरमधील कोकण कड्यावरून उलटा धबधबा प्रवाहित झाला आहे. आंबे हातविज परिसरात दुर्गादेवी कोकण कडा आहे. धुकं, सोसाट्याचा वारा आणि पावसामुळे या कड्यावरील पर्यावरण सौंदर्य खुललं आहे. रिव्हर्स वॉटरफॉल पाहण्यासाठी याठिकाणी पर्यटकांची गर्दी होत आहे. दरवर्षी पावसाळ्यात हे नयनरम्य दृश्य पहायला मिळतं. हेच दृश्य पर्यटक नजरेत साठवण्यासाठी याठिकाणी येतात.
Published on: Aug 07, 2022 01:58 PM