राज्यातील ४८ मतदार संघांचा काँग्रेसकडून आढावा, महाराष्ट्रात स्थिर सरकार कोण देणार? प्रणिती शिंदे म्हणाल्या…
VIDEO | 'राज्यातील शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करणारे हे सरकार', पुणे जिल्ह्यात लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेताना काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर काय केला हल्लाबोल?
पुणे, १४ ऑगस्ट २०२३ | पुणे जिल्ह्यात लोकसभा मतदारसंघांचा आढावा आज काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे यांच्याकडून घेण्यात आला. काँग्रेसने माजी मंत्री, कार्याध्यक्ष यांना लोकसभा क्षेत्रांचा आढावा घेण्यासाठी जबाबदारी दिली असून राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला जात आहे. यावेळी सर्वेचा कल काँग्रेसच्या बाजूने आहे. महाराष्ट्रात काँग्रेस हाच स्थिर सरकार देऊ शकतो. बाकी सगळे पक्ष हे अस्थिर आहेत, असे म्हणत प्रणिती शिंदे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हलालबोल चढवला. तर भाजप हा पक्ष हार्स रायडिंग करत आहे. अशा परिस्थितीत राज्यातील जनतेला काँग्रेस स्थिर सरकार देऊ शकेल. शिंदे-फडणवीस सरकार हे अस्थिर आहे. ते लोकशाही पद्धतीने निवडून आलेलं नाही. ५० खोके तसेच ईडीची भीती दाखवून निवडून आलेलं सरकार आहे. राज्यातील शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करणारे हे सरकार असल्याचा आरोप प्रणिती शिंदे यांनी केला.