VIDEO : Nashik | नाशकात रिक्षा-हायवा गाडीत समोरासमोर जोरदार धडक

| Updated on: Sep 26, 2021 | 12:27 PM

अॅपे रिक्षा-हायवा गाडीत समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात अॅपे रिक्षातील पाच जण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना सायंकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास घडली आहे. लासलगाव विंचूर रोडवरील मंजुळा पॅलेसजवळ हा अपघात झाला. 

अॅपे रिक्षा-हायवा गाडीत समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात अॅपे रिक्षातील पाच जण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना सायंकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास घडली आहे. लासलगाव विंचूर रोडवरील मंजुळा पॅलेसजवळ हा अपघात झाला. यातील दोन प्रवाशी लोणी प्रवरा येथून लासलगाव जवळील पिंपळगाव नजीक येथे भाऊसाहेब पठारे यांच्याकडे अंतविधीसाठी सकाळी आले होते. अंत्यविधी कार्यक्रम आटपून आपल्या गावी जाण्यासाठी ते विंचूरला रिक्षाने जात असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला.

Solapur Rain | सोलापुरात बोरी आणि हरणा नदीला पूर, अनेक गावांचा संपर्क तुटला
VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 26 September 2021