Breaking : शिंदे-फडणवीस सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! सचिवांना दिलेले अधिकार पुन्हा मंत्र्यांकडे

| Updated on: Sep 18, 2022 | 8:45 AM

मंत्रिमंडळ विस्तार झाल्यामुळे आणि खातेवाटपदेखील पूर्ण झाल्यानं शिंदे फडणवीस सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. 4 ऑगस्ट रोजी शिंदे फडणवीस सरकारने काही अधिकार हे सचिवांना बहाल केले होते. त्यामुळे मंत्रालयाचं सचिवालय झाल्याची टीकाही करण्यात आली होती.

मुंबई : शिंदे-फडणवीस (Shinde-Fandnavis Government) सरकारच्या कामाचा वेग आता वाढेल, अशी शक्यता वर्तवली जाते आहे. कारण सचिवांना देण्यात आलेले विशेष अधिकारी शिंदे फडणवीस सरकारने आता संबंधित खात्यांच्या मंत्र्यांना (Maharashtra Minister) दिले आहे. त्यामुळे सरकारच्या कामाचा वेग वाढण्याची शक्यता अधिकारी वर्गाने वर्तवलीय. मंत्रिमंडळ विस्तार (Maharashtra Cabine Expansion) उशिरा झाल्याने सचिवांना विशेष अधिकार सरकारकडून देण्यात आले होते. कोणत्याही खात्याचं काम अडून राहू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तार झाल्यामुळे आणि खातेवाटप देखील पूर्ण झाल्यानं शिंदे फडणवीस सरकारने पुन्हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. 4 ऑगस्ट रोजी शिंदे फडणवीस सरकारने काही अधिकार हे सचिवांना बहाल केले होते. त्यामुळे मंत्रालयाचं सचिवालय झाल्याची टीकाही करण्यात आली होती. अखेर आता पुन्हा सचिवांकडील हेच अधिकार संबंधित खात्याच्या मंत्र्यांना बहाल करण्यात आल्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतलाय.

Published on: Sep 18, 2022 08:44 AM
Dhopeshwar Refinery : रत्नागिरीतील धोपेश्वर रिफायनरी प्रकल्पाबाबत मोठी बातमी! 7 गावांमधून मिळालं संमतीपत्र
Video: उद्योग खात्यामध्ये आधीच्या मंत्र्यांनी काय उद्योग केले हे शोधावे लागेल- उदय सामंत