Nawab Malik | देशातील सलोखा कसा बिघडेल याबाबत वारंवार प्रयत्न सुरू – नवाब मलिक
महाराष्ट्रातील वातावरण बिघडवण्याचं काहींचं कारस्थान आहे. त्याला बळी पडू नका. शांतता पाळा. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. आपल्या राज्यात शांतता कशी राहिल यावर भर द्या, असं आवाहन राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केलं आहे
मुंबई: महाराष्ट्रातील वातावरण बिघडवण्याचं काहींचं कारस्थान आहे. त्याला बळी पडू नका. शांतता पाळा. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. आपल्या राज्यात शांतता कशी राहिल यावर भर द्या, असं आवाहन राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केलं आहे. त्रिपुराच्या घटनेच्या निषेधार्थ अमरावती, नांदेड, मालेगाव, भिवंडी आणि परभणीत प्रचंड हिंसाचार झाला. भाजपने आज अमरावती बंदची हाक दिली आहे. मात्र, या बंदलाही हिंसक वळण लागलं आहे. या पार्श्वभूमीवर नवाब मलिक यांनी मीडियाशी संवाद साधताना नागरिकांना शांतता पाळण्याचं आवाहन केलं आहे.
Published on: Nov 13, 2021 12:13 PM