Nashik | नाशकात गोदावरीच्या पाणीपातळीत वाढ, ड्रोनने टिपलेली दृश्ये पहा
सध्या नाशिकला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण शंभर टक्के भरले आहे. नाशकातील गंगापूर धरणातून पाणी सोडल्यानंतर ड्रोनच्या माध्यमातून घेतलेले हे खास दृश्य tv9 च्या प्रेक्षकांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत.
नाशिकः नाशिकमध्ये पुन्हा एकदा मंगळवारी (28 सप्टेंबर) गोदावरी नदीला पूर आला आहे. दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पुराचे पाणी आले असून, प्रशासनाने नागरिकांना दक्षतेचा इशारा दिला आहे. नाशिकमध्ये 13 सप्टेंबर रोजी गोदावरीला पहिला पूर आला होता. त्यानंतर 22 सप्टेंबर रोजी दुसऱ्यांदा पूर आला. त्यानंतर 28 सप्टेंबर रोजी पुन्हा एकदा गंगापूर धरणातून विसर्ग सुरू केल्याने हा वर्षातला तिसरा पूर गोदावरीला आला होता. सध्या नाशिकला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण शंभर टक्के भरले आहे. नाशकातील गंगापूर धरणातून पाणी सोडल्यानंतर ड्रोनच्या माध्यमातून घेतलेले हे खास दृश्य tv9 च्या प्रेक्षकांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत. गोदावरी नदीच्या हवाई दृश्याचा नजारा पाहाच.