Aurangabad | मोठ्या बहिणीला छेडणाऱ्या रोड रोमियोला धाकट्या बहिणीकडून चोप

| Updated on: Jun 26, 2021 | 10:01 PM

लहान बहिणीने या रोडरोमिओंना चांगलाच चोप दिला. शहरातील सूतगिरणी चौकात हा प्रकार घडला. धाकट्या बहिणीची ही जिगरबाज कामगिरी मोबाईल कॅमेऱ्यात कैद करण्यात आली आहे.

औरंगाबाद : आपल्या मोठ्या बहिणीची छेड काढणाऱ्या रोडरोमिओंना धाकट्या बहिणीने चांगलाच धडा शिकवला आहे. हे भामटे तासाभरापासून पाठलाग करुन या दोन बहिणींकडे पाहून अश्लील हावभाव करत होते. ही बाब समजताच लहान बहिणीने या रोडरोमिओंना चांगलाच चोप दिला. शहरातील सूतगिरणी चौकात हा प्रकार घडला. धाकट्या बहिणीची ही जिगरबाज कामगिरी मोबाईल कॅमेऱ्यात कैद करण्यात आली आहे. (Road romeo teas girls then her beaten by younger sister in Aurangabad video viral on social media)

नेमका प्रकार काय ?

मिळालेल्या माहितीनुसार औरंगाबादमध्ये दोन बहिणी काही कामानिमित्त बाहेर पडल्या होत्या. यावेळी दोन रोडरोमिओ त्यांचा पाठलाग करत होते. त्यानंतर शहरातील सुतगिरणी परिसरात आल्यानंतर या बहिणींमधील मोठ्या बहिणीला हे रोडरोमिओ इशारे करत होते. तसेच मागील दोन तासांपासून पाठलाग करताना अश्लील हावभावही करत होते.

रोडरोमिओंची चांगलीच धुलाई केली

हा प्रकार समजल्यानंतर यातील धाकटी बहीण चांगलीच भडकली. रणरागिणीचा अवतार धार करीत लहान बहिणीने या रोडरोमिओंना चांगलेच चोपले. दोघांचीही या लहान बहिणीने चांगलीच धुलाई केली.

धाकट्या बहिणीचे कौतूक, घटनेचा व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, हा प्रकार घडत असताना बघ्यांची गर्दी होत होती. त्यानंतर घाबरून हे दोन्ही रोडरोमिओ दुचाकी जागेवरच सोडून पळून गेले. हा प्रकार घडल्यानंतर बघ्यांनी तसेच इतर नागरिकांनी धाकट्या बहिणीचे कौतूक केले. तसेच टवळखोर तरुणांना अशाच प्रकारचा धडा शिकवायला हवा अशी प्रतिक्रियाही काही लोकांनी दिली. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

इतर बातम्या :

Video | ब्रिटनच्या आरोग्य मंत्र्यांचं महिला सहकाऱ्यासोबत लिप लॉक, किसिंगचा व्हिडीओ जगभरात व्हायरल

Video | भर रस्त्यात तरुणाकडून किसची मागणी, चिडलेल्या तरुणीने पुढे काय केले ? पाहा व्हायरल व्हिडीओ

Video : नाचता-नाचता खाली पडली पॅंट, पुढे जे झाले ते पाहून व्हाल लोट-पोट

(Road romeo teas girls then her beaten by younger sister in Aurangabad video viral on social media)

Published on: Jun 26, 2021 08:30 PM
Video | छगन भुजबळांनी या वयात तरी खोटं बोलू नये, बावनकुळेंचा टोला
Special Report | देवेंद्र फडणवीसांचं चॅलेंज, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे विरोधकांना चिमटे!