पुण्यातील Purandar तालुक्यात Supriya Sule येण्याआधीच Shivsena नेत्यांकडून रस्त्याचं भूमीपूजन
शिवसेनेला बाजूला ठेवत काँग्रेस राष्ट्रवादीने विकास कामांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केल्याचा सेनेने आरोप केला आहे. त्यामुळे तालुक्यातील गुरोळी येथील रस्त्याच्या कामाचे शिवसैनिकांनी भूमिपूजन केले.
पुणे : खासदार सुप्रिया सुळेंच्या हस्ते होणाऱ्या रस्त्याच्या भूमीपूजनाआधीच शिवसैनिकांनी भूमिपूजन केले. पुरंदर तालुक्यातील विविध विकासकामांचे भूमीपूजन आणि उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र यामध्ये शिवसेनेला बाजूला ठेवत काँग्रेस राष्ट्रवादीने विकास कामांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केल्याचा सेनेने आरोप केला आहे. त्यामुळे तालुक्यातील गुरोळी येथील रस्त्याच्या कामाचे शिवसैनिकांनी भूमिपूजन केले. रस्त्याच्या कामासाठी सेनेचे मंत्री विजय शिवतारे यांनी निधी मंजूर करून आणल्याचा सेना कार्यकर्त्यांनी दावा केला आहे.