Nagpur Crime | नागपुरात 5 जुलै रोजी अवनी ज्वेलर्सवर दरोडा, दरोड्याचं CCTV फूटेज समोर
नागपुरात 5 जुलै रोजी अवनी ज्वेलर्समध्ये दरोडा टाकण्यात आला. या दरोड्याचा थरार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. हादरवून टाकणाऱ्या या थराराचा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद झाला असून, यात तीन आरोपी कश्या प्रकारे ज्वेलर्सच्या मालकाला मारहाण करतात आणि सगळे सोन्या चांदीचे दागिने लुटतात, हे स्पष्ट दिसत आहे.
नागपुरात 5 जुलै रोजी अवनी ज्वेलर्समध्ये दरोडा टाकण्यात आला. या दरोड्याचा थरार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. हादरवून टाकणाऱ्या या थराराचा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद झाला असून, यात तीन आरोपी कश्या प्रकारे ज्वेलर्सच्या मालकाला मारहाण करतात आणि सगळे सोन्या चांदीचे दागिने लुटतात, हे स्पष्ट दिसत आहे. नगदी आणि सोन्या-चांदीचे दागिने अशी 22 लाख रुपयांची लूट केली गेली आहे. या प्रकरणात दोन आरोपींना मध्यप्रदेश मधून अटक करण्यात आली आहे. या भर दिवसा झालेल्या दरोड्या मुळे नागपुरात मोठी चिंता वाढली आहे.